अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळ शिवारात खवले मांजरांची तस्करी करणाऱ्या टोळीला पुणे येथील वनविभागच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पकडले आहे.
दरम्यान वनविभागच्या पथकाने या टोळीकडून एक खवले मांजर, बोलेरो जीप, मोबाईल जप्त केला आहे. तसेच तिघांवर गुन्हा दाखल केला असून एक जण फरार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे येथील वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिपक पवार, वनरक्षक मयूर बोठे यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, सातारा येथे दुर्मिळ खवले मांजराची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तस्करांना संशय आल्याने त्यांनी जागा बदलून पुणे या ठिकाणी विक्री करण्याचे ठरविले. मात्र त्यांना पुणे येथे विक्री करण्याचे ठरविल्याची माहिती समजली असल्याची तस्करांना संशय आल्याने विक्री स्थगित केली.
हे तस्कर पुणे नाशिक महामार्गाने संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ शिवारात गेल्याचे वनविभागाला समजले. पुणे येथील वन अधिकाई व कर्मचारी यांनी पाठलाग करीत घारगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहायाने तिघांना ताब्यात घेतले.