दुचाकीस्वारांना अडवून लुटमार करणार्‍या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागल्याने आता प्रवास देखील जीवासाठी धोकादायक बनू लागला आहे. यातच चोरी, लुटमारी, दरोडा, खून अशा वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांची संख्या वाढू लागली आहे. मात्र यांना रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासन कार्यरत आहे.

नुकतेच पारनेर तालुक्यामध्ये रात्रीच्यावेळी दुचाकीस्वारांना अडवून लुटमार करणार्‍या दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा मोरक्यालाही पोलिसांनी अटक केेली आहे.

पंकज अशोक कळमकर (वय 18 रा. ढवळगाव ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या एकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, 6 जूनच्या रात्री बाबासाहेब गबाजी नरोडे (वय 65 रा. सिद्धेश्वरवाडी ता. पारनेर) हे पानोली रोडने सिद्धेश्वरवाडीकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना मारहाण केली होती.

त्यांच्याकडील दुचाकी, रोख रक्कम, मोबाईल असा 76 हजारांचा ऐवज लंपास केला होता. नरोडे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशीच दुसरी घटना 9 जूनच्या रात्री घडली होती. गोरख चंदन पवार (रा. सारोळा कासार ता. नगर) हे सुपा एमआयडीसीतून घरी जात असताना

त्यांना तिघांनी अडवून मारहाण करत लुटले होते. याप्रकरणी तिघांविरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदरचे गुन्हे पंकज कळमकर याने अल्पवयीन मुलांच्या साथीने केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.

त्यांनी तात्काळ पोलीस पथकाला सूचना देऊन पंकज याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईल, दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24