अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- श्रीरामपूर शहरातील रहिवासी बेलापूरचे बेपत्ता झालेले व्यापारी गौतम हिरण यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.
आता याप्रकरणात हिरण यांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी सबळ पुराव्याच्या आधारे सागर गंगावणे व बीट्टू उर्फ रावजी वायकर या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गौतम हिरण यांच्यावर झालेल्या शवविच्छेदनानंतर त्यांचा मृत्यू हा डोक्याला मार लागून जखमी झाल्याने झाला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. हिरण यांच्या हत्येप्रकरणी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपुरात शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
दरम्यान बेलापूरचे व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचे 1 मार्च रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर 2 मार्च रोजी अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर रविवारी (७ मार्च) त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत एमआयडीसी शिवारात आढळून आला.
त्यानंतर पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिस अधीक्षक पाटील स्वतः दोन दिवस श्रीरामपुरात तळ ठोकून होते. सबळ पुरावा मिळाल्यानंतर पोलिसांनीसागर गंगावणे व बिट्टू उर्फरावजी वायकर या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहेत.
पाटील म्हणाले, हिरण यांची हत्या अपहरणाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर रविवारी मृतदेह आणून टाकला, तोपर्यंत मृतदेह कोठे लपवला होता याचाही पोलीस शोध घेत आहेत. दोन्हीही आरोपी श्रीरामपुरातील आहेत. त्यांना परिसरातूनच ताब्यात घेण्यात आले आहेत.
या आरोपींवर यापूर्वीचे विविध गुन्हे दाखल आहेत. प्रकरणी अद्याप बराच तपास बाकी असून तोपूर्ण तपास काही दिवसात हा तपास पूर्ण करणार असून या प्रकरणाच्या तपासासाठी केवळ पोलीस निरीक्षकच नसून आमच्या तीन पथके आहेत. त्यामुळे आमचे या प्रकरणाकडे संपूर्ण लक्ष असून लवकरच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावू, असेही त्यांनी सांगितले.