अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-कोरोनामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यातच जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.
कोरोना काळातही जिल्ह्यात अवैध धंदे जोमात सुरूच आहे. याला अटकाव करण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची मोहीम देखील सुरूच आहे. नुकतेच नगर तालुक्यातील नेफ्ती येथील तीन गावठी दारूअड्डे उद्ध्वस्त करण्याची कारवाई नगर तालुका पोलिसांनी बुधवार (दि.५) केली आहे.
यामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील नेफ्ती येथे पोलिसांनी चौगुलेवस्तीवर बाभळीच्या झाडाखाली सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकून १० हजार रु.किं.ची गावठी हातभट्टी दारू तयार व
२४ हजारांची दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ४०० लिटर असा एकूण ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि चौगुलेवस्ती येथेच सुनिल बाजीराव पवार याच्या राहत्या घराच्या भिंतीच्या ओडशाला सुरू असणारा दुस-या गावठी दारूभट्टी अड्ड्यावर छापा टाकण्यात आला.
या छाप्यात ७ हजार रुपयांची गावठी दारू तयार करण्याचे ७० लिटर व ३६ हजार रुपये गावठी हातभट्टी दारू तयार करण्याची कच्चे रसायन ६०० लिटर असा एकूण ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला,
तर तिसऱ्या ठिकाणी सुनील बाजीराव पवार याच्या राहत्या घराच्या भिंतीच्या ओडशाला सुरू असणाऱ्या हातभट्टीवर छापा टाकून या ठिकाणाहून ३० हजार रुपयांचे ५०० लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे कच्चा रसायन जप्त केले व हातभट्टी उद्ध्वस्त केली.