अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे आढळून आलेल्या मृतदेहाचा खुलासा झाला आहे. सदर व्यक्तीची हत्या करण्यात आली असून पोलिसांनी त्याच्या मारेकर्यांना जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील वडाळा महादेव येथील राऊत वस्ती परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ दोन दिवसांपूर्वी घरात मृतदेह आढळून आला होता.
राऊत वस्ती परिसरातील घरातून वास सुटल्याने परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती श्रीरामपूर पोलीस ठाणे याठिकाणी कळविली. पोलिसांनी सदर व्यक्तीचा घरातील मृतदेहाबाबत माहिती घेतली.
यावेळी पोलीस पथकाने सदर व्यक्ती बाबत परिसरात व नातेवाईक यांच्याशी चर्चा विनिमय करून माहिती मिळविली. यावरून अमोल कसबे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाणे याठिकाणी खबर दिली वैद्यकीय तपासणी नुसार सदर व्यक्तीचा घातपात असल्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी दिली होती.
यावरून पोलीस नाईक संजय दुधाडे यांनी परिसरात सापळा लावून जॅक ओहोळ यास ताब्यात घेत चौकशी केली असता जॅक ओहोळ या गुन्हेगाराने गुन्हा कबुल केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.