अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- राहुरी नगरपरिषद प्रशासनाने आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी पोलिस बंदोबस्तामध्ये धडाकेबाज कारवाई करत शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.
नगरपरिषदच्या या कारवाईचे आरपीआय आठवले गट व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले. मात्र अगोदर शहरातील धन दांडग्यांचे पक्के अतिक्रमण काढा. अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आलाय. राहुरी नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहेत.
त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी नगरपरिषद प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्या बाबत नोटिस बजावण्यात आल्या.
तसेच दोन दिवसापूर्वी वर्तमान पत्रात जाहिर नोटिस देण्यात आली. आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांनी नगरपरिषद कर्मचारी व पोलिस बंदोबस्त घेऊन शहरातील पाण्याच्या टाकी पासून भागीरथी शाळा रोड चे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.
काही दुकानाच्या पायऱ्या तोडल्या तर काही टपऱ्या तोडून जप्त करून घेतल्या. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची दिवसभर धावपळ झाली. यावेळी आरपीआय आठवले गटाचे तालूकाध्यक्ष विलासनाना साळवे व वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष पिंटूनाना साळवे यांनी नगरपरिषद च्या कारवाईचे स्वागत केले.
परंतू शहरातील कुलकर्णी हाॅस्पिटल ते शिवाजी चौक, शनिचौक तसेच नवीपेठ भागात धन दांडग्यांनी अनेक बांधकामे परवानगी न घेता अनाधिकृतपणे बांधली आहेत. शहरातील अनेक दवाखान्यांना पार्किंग व्यवस्था नाही. त्यांच्यामुळेच वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.
पालिका प्रशासनाने अगोदर अतिक्रमणमध्ये असलेल्या धन दांडग्यांच्या मोठ्या इमारती पाडाव्यात. त्यानंतर छोट्या मोठ्या टपऱ्या धारकांवर कारवाई करावी. तसे केले तर आम्ही नगरपरिषद प्रशासन व मुख्याधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करु. धन दांडग्यांना पाठीशी घालून गोर गरीबांवर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही.
याबाबत तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा ईशारा यावेळी आरपीआय आठवले गट व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलाय.