file photo

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- अतिक्रमणाच्या समस्येने ग्रासलेल्या राहुरीकरांना अतिक्रमण विभागाच्या कारवाईमुळे मोकळा श्वास घेता येऊ लागला आहे. राहुरी नगरपरिषद हद्दीत असलेले अतिक्रमण पोलिसांच्या मदतीने हटवण्यात आले आहे.

यामुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राहुरी नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

काही दिवसांपूर्वी नगरपरिषद प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी नगरपरिषद कर्मचारी व पोलीस बंदोबस्त घेऊन शहरातील पाण्याच्या टाकीपासून भागीरथी शाळा रोडचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.

काही दुकानांच्या पायऱ्या तोडल्या, तर काही टपऱ्या तोडून जप्त करून घेतल्या. अतिक्रमणाच्या धडक कारवाईमुळे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची दिवसभर धावपळ झाली.

धनदांडग्यांना पाठीशी घालून गोरगरिबांवर अन्याय

शहरातील कुलकर्णी हाॅस्पिटल ते शिवाजी चौक, शनिचौक तसेच नवीपेठ भागात धनदांडग्यांनी अनेक बांधकामे परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधली आहेत.

पालिका प्रशासनाने अगोदर अतिक्रमणमध्ये असलेल्या धनदांडग्यांच्या मोठ्या इमारती पाडाव्यात, त्यानंतर छोट्या मोठ्या टपऱ्याधारकांवर कारवाई करावी. अशी मागणी होऊ लागली आहे.