दुचाकीच्या अपघातात पोलीस कर्मचार्याच्या मुलीचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- जिल्ह्यात शुक्रवार हा घातवार ठरला आहे. जिल्ह्यात कालच्या दिवसाला अनेक अपघात झाले, यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील झाला.

दरम्यान शहरातील एका अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. संबंधित तरुणी पोलीस कर्मचार्याची मुलगी होती.

दुचाकीच्या अपघातात कोमल यशोदास पाटोळे (वय 18 रा. नागापूर, नगर) या मुलीचा मृत्यू झाला आहे. नगर- मनमाड रोडवरील हुंडेकरी लॉन्ससमोर शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोमल दुचाकीवर नगर- मनमाड रोडने नागापूरकडून नगरच्या दिशेने येत असताना

हुंडेकरी लॉन्स समोर तिचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी डिव्हायडरला जावून आदळली. यात कोमलच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यशोदास पाटोळे यांची ती मुलगी होती.

अहमदनगर लाईव्ह 24