अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्या झाल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात आला आहे.
राहुरी पोलिस ठाण्यात दातीर यांचे अपहरण आणि हत्या झाल्याचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी सविता रोहिदास दातीर राहणार राहुरी यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे आपल्या जीवितास धोका असल्याने आपल्याला संरक्षण मिळावे अशी मागणी केली होती.
सदर अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रमुख यांनी आज दिनांक ११ एप्रिलपासून त्यांच्या कुटुंबियांस पोलीस संरक्षण दिले आहे.
पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येनंतर हे प्रकरण राज्यात गाजत आहे.त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना तात्काळ पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी भेट देऊन पोलीस संरक्षणाची पाहणी केली.
दरम्यान दातीर हत्या प्रकरणी गुन्ह्याचे अनुषंगाने कोणत्याही व्यक्तीस कोणताही पुरावा अथवा पुरावा म्हणून कोणताही दस्तऐवज,अभिलेख किंवा काही कागदपत्रे पुरवण्याच्या दृष्टीने सादर करायचे असल्यास तर त्यांनी राहुरी पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा.
तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याशी फोन करून सदर माहिती द्यावी माहितीदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी केला आहे.
त्यांनी याबाबत पोलिस ठाण्याचा फोन नंबर आणि आपल्या मोबाईल नंबर देखील जारी केले आहेत.
०२४२६-२३२४३३ अथवा मोबाईल नंबर ९४२३५८३९५५ या मोबाईल क्रमांकावर कुणाला काही माहिती असल्यास माहिती द्यावी असे आव्हान दुधाळ यांच्याकडून करण्यात आले आहे.