अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-गेल्या काही दिवसात जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातच जुगार अड्डे वाढले असून दरदिवशी जिल्ह्यात कोठेना कोठे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडतच असतो.
नुकतेच कर्जत शहरातील शारदानगरी परिसरामध्ये एका शेतात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर कर्जत पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात युवराज भगवान पठाडे, (रा. भापकरमळा, कर्जत), बाळासाहेब नामदेव थोरात,
(वय ६२ वर्षे, रा. बहिरोबावाडी, ता.कर्जत), नवनाथ धोंडीबा लष्कर, (वय ४८, रा. बहिरोबावाडी, ता.कर्जत), अनिल रघुनाथ जाधव, (वय ४२ वर्ष, रा. बहिरोबावाडी, ता. कर्जत), भागवत भिमराव महारनवर,
(वय ४० वर्ष, रा. माहीजळगाव, ता. कर्जत), अण्णा दशरथ यादव, (वय ४८ वर्षे, रा. बहिरोबावाडी, ता. कर्जत), कांतीलाल सिताराम तांदळे, (वय ४७ वर्ष, रा. बहिरोबावाडी, ता. कर्जत), लक्ष्मण हनुमंत जाधव,
(वय ५९ वर्षे, रा. बहिरोबावाडी, ता. कर्जत), सचिन जाधव, (रा.बहिरोबावाडी, ता.कर्जत), शशिकांत अडसूळ, (रा. कोरेगाव ता. कर्जत) असे एकूण आठ आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे, तर दोन आरोपी फरार आहेत.
अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातील ७० हजार २०० रुपये रोख रक्कम आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.