अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातला असल्याची घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडली आहे.
या वेळी त्यांच्याकडून तब्बल पाच हजार रुपये रोख रक्कम व तिरट नावाचे जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल मिळून आला. दरम्यान हि कामगिरी अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार रोहित येमुल यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत आरोपी अंकुश गंगाधर मकासरे (वय ३२), राहुल विठ्ठल धनवटे (वय ३०),
विकास नारायण कुसमुडे (वय २५), राजेंद्र पांडुरंग व्यवहारे (वय ४७), अमोल प्रभाकर कुसमुडे (वय ३८) या पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.