जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; मुद्देमाल केला जप्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर शिवारात काही इसम जुगार खेळत असल्याबद्दल श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथील पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव यांना माहिती मिळाली.

यावरून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा घेतला.

यावेळी मातापूर शिवारात बनकरवस्ती परिसरातील हाडोळ्याच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली काही इसम जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

यावेळी त्यांच्याकडे तपासणी केली असता रोख रक्कम, मोबाईल व पत्ते आढळून आले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर आरोपींवर कडक कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24