अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- नगर जिल्ह्यासह शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली असून शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. यामुळे शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाने अवैध धंदे चालकांवर कारवाईचा बडगा उआगरला आहे.

नुकतेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्ह्यातील हातभट्टी दारू अड्ड्यावर छापेमारी केली. दोन दिवसांमध्ये 10 ठिकाणी छापे टाकून दोन लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकूण 11 आरोपीविरोधात श्रीगोंदा, सोनई, तोफखाना, नगर तालुका, पारनेर,

श्रीरामपूर शहर व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोर्जे,

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने ही कामगिरी केली. हातभट्टी दारू अड्ड्यावर होत असलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील हातभट्टी चालकांसह, दारू विक्रेत्यांचे दाबे दणाणले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24