अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे गोदावरी नदी पात्रात तालुका पोलिसांना धाड टाकली. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन ट्रॅक्टर, ट्रॉली, व दोन ब्रास वाळू असा 6 लाख रुपये किमतीचा मृद्देमाल जप्त केला असून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे
दरम्यान वाळू तस्करी प्रकरणी आरोपी शुभम विश्वनाथ गवारे (रा. मंजूर, कैलास गाढे रा. चासनळी), एकनाथ माळी (रा. मोर्विस), बबलू बाळासाहेब कापसे (रा.कासारी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील धामोरी शिवारात गोदावरी नदीपात्रात.12 जून रोजी कोपरगाव तालुका पोलीसांनी धाड टाकली असता
आरोपी शुंभम गवारे व कैलास गाढे यांनी संगनमताने मोर्विस गावचे जवळील गोदावरी नदीपात्रातील एक ब्रास शासकीय वाळू विनापरवाना बेकायदेशीरपणे ट्रॅक्टर मध्ये भरली.
आरोपी एकनाथ माळी व बबलू कापसे यांनी बेकायदेशीरपणे गोदावरी नदी पात्रात ट्रॅक्टर ट्रॉलीसह उतरून वाळूची चोरी करण्याचा प्रयत्न केला.
आरोपी एकनाथ माळी हा गोदावरी नदी पात्र ट्रॅक्टर ट्रॉली सोडून पळून गेला व आरोपी बबलू कापसे हा गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टर ट्रॉली सह पळून गेला. पो.कॉ. अंबादास वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.