अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- विनापरवाना बेकायदा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टी दारुचे उत्पादन करणाऱ्या वाळकी शिवारातील अड्ड्यावर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने छापा टाकून ३१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करूनहा अड्डा उदध्वस्त केला आहे.
याबाबतची माहिती अशी की नगर तालुक्यातील वाळकी येथील धोंडेवाडी तलावाच्या भिंतीच्या आडोशाला गावठी हातभट्टी दारूचा अड्डा सुरू असून मोठ्या प्रमाणात दारू बनवून विक्री केली जाते, अशी माहिती नगर तालुका पोलिसांनी मिळाली.
यामाहिती वरून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप यांनी दिलेल्या सूचनेनुसार नगर तालुका पोलिसांच्या पथकाने वाळकीतील धोंडेवाडी येथील तलावाजवळ सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापा टाकला.
पोलिसांना पाहताच दारू अड्डा मालक संतोष दिलीप पवार ( रा.धोंडेवाडी, वाळकी, ता. नगर ) हा पळून गेला . या कारवाईत चोवीस हजार रुपये किमतीची चारशे लिटर हातभट्टीची दारू तयार करण्याचे कच्चे रसायन , सात हजार रुपये किमतीची सत्तर लिटर हातभट्टी तयार दारू असा ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.