पोलिसांनी छापा टाकून पकडली दीड लाख रुपये किंमतीची दारू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- आठ दिवसांच्या विश्रांती नंतर तालुक्यातील दारू अड्यावर पोलिसांचे छापे सञ सुरू झाले असून मंगळवारी म्हैसगाव परीसरात दारू अड्यावर पोलिसांनी छापा टाकला असून सुमारे १ लाख ३० हजार रुपयांची दारू जप्त करत मोठी कारवाई केली आहे.

म्हैसगाव परिसरामध्ये अवैध दारूसाठा असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना मिळाल्यानंतर कैलास टेमकर,संतोष राठोड,अजिनाथ पाखरे, जालिंदर साखरे,अशोक कोळगे आदिंच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असते देशी,

विदेशी दारू तसेच बियरच्या बाटल्या अशी सुमारे १ लाख ३० हजार रूपये किंमतीची दारू हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी निवृत्ती मोहन विधाटे यास ताब्यात घेतले असून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पो.नि.नंदकुमार दुधाळ यांनी राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासुन अवैध दारू विक्री विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे.

त्यातच आज दिवसभरात ठिकठिकाणी दारू अड्यावर छापे मारले असून दिड लाखा पेक्षा जास्त किंमतीची दारू हस्तगत करण्यात आला आल्याने तालुक्यातील अवैध व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24