बेजबाबदार नागरिकांकडून पोलिसांनी वसूल केला 56 लाखांचा दंड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- करोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून पोलीस प्रशासनाने मोठा दंड वसूल केला आहे. यामध्ये 19 फेब्रवारी ते 01 एप्रिल या 42 दिवसांच्या कालावधीत 26 हजार 896 केसेस करून 56 लाख 32 हजार 200 रूपयांचा दंड वसूल केला आहे.

मध्यंतरी आटोक्यात आलेल्या करोना संसर्गाने फेब्रुवारीत पुन्हा डोेके वर काढले. लग्न सोहळा, धार्मिक कार्यक्रम, निवडणूका यामुळे लोकांची सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढली. करोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला.

फेब्रुवारीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रतिबंधक उपाययोजनांचे उल्लंघन करणार्‍यांना दंड करण्याचे आदेश काढले. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळून आल्यास दोनशे रूपये असलेल्या दंडात 500 रूपयापर्यंत वाढ केली आहे.

लग्नसमारंभात मोठ्याप्रमाणत गर्दी होत होती. मंगलकार्यालयात 50 पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास संबंधित मंगलकार्यालयाच्या मालकाला 10 हजार रूपये दंड आकारला जात आहे.

नगर शहरासह जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू असल्याची बाब पोलीस अधीक्षक पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी गुरूवारी रात्री स्वत: हॉटेलवर कारवाई करून हॉटेल मालकासह तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांकडून दंड वसूल केला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24