अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- कत्तलीसाठी आणलेल्या 38 गायींची पोलिसांनी सुटका केली. नगर तालुका पोलिसांनी वाळकीत ही कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तोसिफ शेख (रा. वाळकी) याला अटक केलेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तौसिफ़ शेख हा कत्तलीसाठी गाई घेऊन येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना कळाली.
त्यांनी पथकासह वाळकी सापळा लावत महिंद्रा पीक अप टेम्पो ताब्यात घेतला. त्यात गोवंश जनावरे होती. या गाई झेंडीगेट येथे कत्तलसाठी घेऊन जात असल्याचे शेख याने कबुली दिली.
तोसिफ शेख, अखिल कुरेशी, मोसीन कुरेशी (सर्व रा. झेंडीगेट) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तौसिफ यास अटक केली आहे.
11 लाख 28 हजार किंमतीच्या गाई आणि 5 लाखाचा पिकअप टेम्पो असा 16 लाख 28 हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
दरम्यान तौसिफ़ याने वाळकी-धोंडेवाडी रोडवरील अखिल कुरेशी यांचे शेतातून ही जनावरे आणली असल्याचे त्याने सांगितले. पोलीस कुरेशीच्या शेतावर पोहचले. तेथे झाडाझुडपात 20 गाई बांधल्याचे दिसले.
मोसीन कुरेशी याच्या वाळकी येथील पमोकळ्या प्लॉटवर 12 गाई आढळून आल्या. अशा 38 गायींना ताब्यात घेत पोलिसांनी त्या माऊली कृपा गोशाळेत पाठविल्या आहेत.