अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- श्रीरामपूर शहरात कत्तलीसाठी आणलेल्या पाच गायींची पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने सुटका केली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना श्रीरामपुर शहरातील टिळकनगर येथील संविधान कॉलनी येथे एका घराचे लगत गोवंश जातीचे प्राण्यांना कत्तल करण्यासाठी बांधून ठेवण्यात आले आहे अशी खात्रीशीर गोपनीय बातमी मिळाल्याने टिळक नगर येथील
संविधान कॉलनी येथे एका घराचे लगत अधिकारी व अंमलदार यांचे पथक व दोन पंचासह छापा टाकून एकूण १ लाख रुपये २५ हजार रुपये किंमतीच्या ५ गायींची सुटका करण्यात आली आहे. सदरचे छाप्याचा दोन पंचांसमक्ष पंचनामा करून आरोपी करण सुरेश कांबळे (रा.टिळकनगर तालुका श्रीरामपूर),
फिरोज मुसा कुरेशी (रा.वार्ड नंबर 2 श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोका/2752 नितीन सुभाष चव्हाण नेमणूक उपविभागीय कार्यालय श्रीरामपूर यांचे
फिर्यादीवरून गुन्हा रजिन – I l 473/2021 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम1995 चे सुधारित कायदा2015 चे कलम 5 ,5(b)9 सर्व प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम1960 चे कलम11(c)(j) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली,पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके , पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे, पो. हे.कॉ. साबदे,
पो.ना शेलार, राशिनकर, पो.कॉ. रवींद्र बोडखे, नितीन चव्हाण, रवींद्र माळी, बाळू गुंजाळ आदींनी केली.