अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- एका शेतकर्याचे घर फोडून पावणे दोन लाखांचा सोन्याचा राणीहार चोरट्यांनी चोरला होता. तो हार नगर तालुका पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केला आहे.
हि घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे घडली होती. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील शिवाजी लांडगे हे कुटुंबीयांसह चार महिन्यांपूर्वी शेतातील कामे करत होते.
दुपारच्या वेळेस चोरट्यांनी त्यांचे बंद घरफोडून कपाटातील पावणे दोन लाखांचा सोन्याचा राणीहार चोरला होता. लांडगे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखा व नगर तालुका पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत घरफोडी, चोरी करणारे सराईत गुन्हेगार ईश्वर भोसले, भगवान काळे, मिलिंद काळे यांना पकडले.
या टोळीने पिंपळगाव लांडगा येथील शिवाजी लांडगे यांचे घरफोडले असल्याची कबूली दिली. तेथून चोरलेला राणीहार पोलिसांच्या ताब्यात दिला. न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलिसांनी लांडगे दाम्पत्याकडे हा राणीहार सुपूर्द केला.