अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांनी रोखला ; मुलीच्या आई- वडिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार अशी माहिती चाईल्ड लाईन च्या 1098 या बालकांच्या हेल्पलाईनवर माहिती मिळताच

चाईल्ड लाईन सदस्यांनी ताबडतोब ही बाब पोलीस हेल्पलाईन 112 वर माहिती दिली, या अल्पवयीन मुलीचा विवाह राहाता पोलिसांनी रोखला आहे.

याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, साकुरी येथील एका लॉन्स शेजारी असलेल्या एका घरासमोर मंडप टाकून बालविवाह होत असल्याचे पोलिसांना कळाले.

त्यांनी साकुरी येथील ग्रामसेवक यांना याबाबत खात्री करण्यास सांगितले. ग्रामसेवक रामदास पुंडलिक डूबे यांनी खात्री केल्यानंतर त्यांना त्या लॉन्सजवळ उत्तर बाजुला घरासमोर मंडप टाकलेला दिसला.

त्यांनी याबाबत माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी विलंब न करता ताबडतोब आपल्या पथकाच्या मदतीने आणि सुकोरी गावाचे ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी धडाकेबाज कार्यवाही करत बालविवाह रोखला.

दरम्यान सदर प्रकरणातील आरोपींना सदर मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असताना सुद्धा तिच्याशी विवाह करण्याची तयारी दर्शवून विवाहाची तयारी केली होती म्हणून सरकार तर्फे फिर्याद देत बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 11 प्रमाणे कायदेशीर फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office