अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- अवैध दारू विक्रीसाठी नेेत असताना पोलिसांनी मागील दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईमध्ये 1 लाख 54 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तर पाच आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अकोले पोलिसांना गुप्त माहिती समजली कि, वाशेरे फाटा येथे मंगेश कोंडाजी ढोकरे (वय 36, शाहूनगर, ता. अकोले) व दत्तात्रय दिनकर नाईकवाडी (रा. अकोले) हे देशी दारूच्या सीलबंद बाटल्या दुचाकीवरून अवैधरित्या विक्रीसाठी वाहतूक करत असताना मिळून आले.
या दोन्हीही आरोपींना ताब्यात घेऊन अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसर्या गुन्ह्यात तालुक्यातील अकोले ते वाघापूर अवैध दारुची वाहतूक होणार असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी छापा टाकून अवैधरित्या दारूविक्री करण्याचे उद्देशाने दारू वाहतूक करताना सद्दाम सलीम मणियार (कमानवेस, अकोले) रंगनाथ शांताराम पवार, सुनील बबन लांडे ( दोघे रा. वाघापूर) यांना 1 लाख 20 हजार 160 रुपयांची अवैध दारू वाहतूक करताना एका चार चाकी वाहनासह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
दरम्यान अकोले पोलिसांनी अवैध दारू विक्री करणार्यांविरुद्ध कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे.