पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा ; विनाकारण फिरणाऱ्यांची जप्त केली वाहने

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदीचा आदेश देण्यात आले आहेत. असे असताना अनेक नागरिक या ना त्या निमित्ताने विनाकारण रस्त्यावर येतात.

यामुळे करोनाच्या पार्श्वभूमिवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची तब्बल 50 ते 60 वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

श्रीरामपूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजी रोड, महात्मा गांधी चौकासह श्रीरामपूर हद्दीतील प्रमुख मार्गांवर व चौकांमध्ये वेळोवेळी नाकाबंदी करून या कारवाया करण्यात आल्या.

नागरिक खोटी व चुकीची माहिती देऊन विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

दरम्यान श्रीरामपूर पोलिसांनी सातत्याने केलेल्या कारवायांमुळे व मोठ्या प्रमाणावर वाहने जप्त केल्यामुळे अनावश्यक नागरिक रस्त्यावर येणे बंद झाले आहेत.

जप्त करण्यात आलेली वाहने संचारबंदी संपल्यानंतर म्हणजेच तीन जूननंतर संबंधितांना मिळतील, असे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24