नागवडे कारखान्यातील विरोधकांचे फॉर्म अवैध ठरवरण्यामागे राजकारण की अर्थकारण ? :- संदिप नागवडे

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  सोमवार दिनांक २० डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या छाननी मध्ये पाचपुते गटाचे जवळपास २६ अर्ज निवडणूक अधिकाऱ्याने अवैध ठरविल्याने तहसील परिसरात वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते.(Nagwade Sugar Factory Election)

उस उत्पादक शेतकऱ्यामध्ये व इच्छुकांमध्ये एकच चर्चा चालू होती ती म्हणजे अधिकाऱ्यांकडून फॉर्म बाद करण्याचे पाप राजकिय दबावापोटी झाले आहे की काही आर्थिक देवाणघेवाण झाली आहे.

अशी चर्चा चालू असतानाच निकाल रात्री ११.३० पर्यंत लांबवला गेला. यावेळी रात्री ११.३० पर्यंत निवडणूक अधिकारी कोणत्या नियमांचे पुस्तक वाचत होते असा सवाल संदीप नागवडे यांनी उपस्थित केला आहे.

राजेंद्र नागवडे यांच्या विरोधात एक संतापाची लाट निर्माण झाली आहे. ३०४ फॉर्म दाखल झाल्यानंतरच यांना धडकी भरलीयं त्यामुळे या विरोधी लाटेत अवैध मार्गाने निवडणुकीत टिकण्याची धडपड राजेंद्र नागवडे यांच्याकडून चालू आहे.

पाचपुते गटाने जर निवडणूक लढवली तर हार निश्चित आहे हे लक्षात आल्यामुळे यांना लढूच द्यायचे नाही असा रडीचा डाव राजेंद्र नागवडे खेळत आहेत, परंतु आम्ही या विरोधात कोर्टात जाणार असुन निवडणुक कोणत्याही परिस्थितीत लढवून जिंकणारच असा विश्वास नागवडे यांनी व्यक्त केला.

नागवडे कारखान्या सारख्या जुन्या सहकारी साखर कारखान्यातील प्रचंड भ्रष्टाचारामुळे कारखान्यावर कर्जाचा प्रचंड डोंगर झाला असुन या निवडणुकीत सत्तापरिवर्तन न झाल्यास कदाचित ही नागवडे कारखान्याची शेवटची निवडणूक ठरू शकते असा सवाल या निमित्ताने संदिप नागवडे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच यांचे नविन असलेले खाजगी कारखाने मात्र प्रचंड नफ्यात आहेत हे असे कसे असा प्रश्न सर्वसामान्य ऊस उत्पादकांना पडला आहे.

ऊस उत्पादक शेतकर्यांच्या हितासाठी नागवडे कारखाण्याची निवडणूक आम्ही आ.बबनरावजी पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदिनीशी लढणार असून राजेंद्र नागवडे यांचा सर्व भ्रष्टाचार लोकांसमोर आणणार आहोत.

यांची सर्व कुंडली आमच्याकडे आहे, आणि ती लोकांसमोर, सर्वसामान्य ऊस उत्पादकांसमोर मांडण्याचे काम आम्ही प्रचारात करणारच आहोत. त्यावेळी यांना पळती भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही असे संदीप नागवडे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office