लक्ष विचलित करण्यासाठी राजकारण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-विविध प्रकरणांमध्ये महाविकास आघाडी सरकारची होत असलेली नाचक्की आणि स्वत:चा गैरकारभार या दोन्हींपासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच कोरोना लसीची अनुपलब्धता पुढे करत नाहक राजकारण केले जात असल्याचा पलटवार विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केला.

राज्यातील कोरोना आणि लसीकरण हे महत्त्वाचे प्रश्न आहेतच, परंतु आज व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाहीत, रेमडेसिविर उपलब्ध नाही,

ऑक्सिजन उपलब्ध नाही, साधे बेडसुद्धा उपलब्ध नाहीत तर राज्य सरकारच्या अखत्यारीतील बाबी आहेत.

मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही. याकडे मुख्यमंत्री आणि मंत्री लक्ष देणार का, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

फडणवीस यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला.

त्यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले की, केवळ तीन राज्यांनाच १ कोटीपेक्षा अधिक लस प्राप्त झाल्या आहेत.

त्यात महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांचा समावेश आहे. यात गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या समान आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24