डाळिंबाला मिळाला उच्चांकी भाव; जाणून घ्या प्रतिकिलोचे दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :-  कोरोना तसेच अतिवृष्टी या संकटांचा सामना करत बळीराजाने आपले पीक पोटच्या पोराप्रमाणे मोठ्या हिमतीने जपले आहे. यामुळे बाजरात त्याला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा उत्पादक शेतकऱ्यांनी बाळगली आहे.

यातच सध्याच्या स्थितील डाळिंबाला उच्चांकी दर प्राप्त झाला आहे. रविवारी राहाता बाजार समितीमध्ये डाळिंबाच्या प्रति किलोस 255 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

5322 डाळिंबाच्या क्रेटसची आवक झाली होती. डाळिंब नंबर 1 ला 151 ते 255 रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला. डाळिंब नं. 2 ला प्रतिकिलोस 91 ते 150 रुपये असा भाव मिळाला.

डाळिंब (नंबर 3 ला प्रतिकिलोस 46 ते 90 असा भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 5 ते 45 रुपये असा प्रतिकिलोस भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.