अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- वायकरवस्ती, ता.पाथर्डी येथील प्रयोगशील शिक्षक पोपटराव फुंदे यांना बारामती येथील शब्दधन फाऊंडेशनचा ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक’ पुरस्काराने संशोधक डॉ.भापकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.शहा, प्रा.मनोज वाबळे, ह.भ.प. संजय वाबळे, अनुराधा फुंदे आदि मान्यवर उपस्थित होते. गरजू अनाथ विधवा यांच्यासाठी काम करत सामाजिक कार्यात मोठ नावलौकिक असलेले फुंदे दांम्पत्य हे गेले काही वर्षे विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन प्रयोग उपक्रम राबवत आहेत.
कोरोना काळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार स्वकल्पकतेने मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक साहित्य निर्मिती करत साहित्याद्वारे घरोघरी हसत खेळत शाळा हा उपक्रम राबवला. या उक्रमाची विदेशातून मोठी दखल घेत जूनमध्ये फुंदे यांचे हे साहित्य कुरिअरद्वारे अमेरिकेत पोहचलंय यासह केनिया, कॅ नडा या देशातही मागणी होत आहे.
वर्षभराचा अभ्यासक्रम काही महिन्यातच संपवणार हे शैक्षणिक साहित्य कोरोनाकाळात वरदान ठरल्याच फुंदे सांगतात. खेळणीसारख वाटणार हे साहित्य हाताळत मुल हसत खेळत सहज शिकतात. सध्या त्यांच्याकडील दुसरीची मुल चौथीच्या अभ्यासाच सहज अवलोकन करतात.
त्यामुळे पाथर्डी शहरातील अनेक मुलं फुंदे याच्या वाडी-वस्तीवरील शाळेत ज्ञानार्जनासाठी दाखल होतायत. पोपटराव फुंदे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून मोठ कौतुक होत आहे.