अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- आदर्श गाव हिवरे बाजार येथील ग्रामपंचायतची सरपंच उपसरपंच निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तोरडमल ए.एफ. यांनी काम पाहिले. यावेळी सरपंचपदासाठी सौ.विमल दिपक ठाणगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.
त्यास सूचक म्हणून सौ.रंजना राजू पवार तर उपसरपंच पदासाठी पोपटराव भागुजी पवार यांचा एकमेव अर्ज आला. त्यांच्या नावाची सूचना रोहिदास नामदेव पादीर यांनी केली. त्यास सदस्य विठ्ठल भाऊ ठाणगे, रोहिदास नामदेव पादीर, सौ.रंजना राजू पवार, सौ.मीना संदीप गुंजाळ, सौ.सुरेखा बना पादीर या सदस्यांनी पाठींबा दिल्याने या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या.
यावेळी हरिभाऊ ठाणगे सर, एस.टी.पादीर सर, अर्जुन पवार, रामभाऊ चत्तर, बन्शी ठाणगे, सीताराम भालेकर, सहदेव पवार गुरुजी, छबूराव ठाणगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.