ताज्या बातम्या

फेसबुकची गुंतवणूक असलेली लोकप्रिय ‘मीशो’ IPO आणण्याच्या तयारीत

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Money News :- स्टार्टअप कंपनी मीशो या इश्यूद्वारे निधी उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनीला Facebook ची मूळ कंपनी Meta Platforms आणि Softback Group च्या Vision Fund 2 द्वारे निधी दिला जातो.

बंगळुरूमधील सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म 2022 च्या उत्तरार्धात किंवा 2023 च्या सुरुवातीला लिस्ट होऊ शकतो. कंपनी भारतीय आणि यूएस या दोन्ही बाजारपेठांमध्ये लिस्ट होण्याची शक्यता तपासत आहे.

यावर्षी सप्टेंबरमध्ये, मीशोने सीरिज एफ फंडिंग फेरीत 57 कोटी डॉलर जमा केले. फिडेलिटी मॅनेजमेंट अँड रिसर्च कंपनी आणि बी कॅपिटल ग्रुप यांच्या नेतृत्वाखाली मीशो यांनी हा निधी उभारला होता.

यूजर्स सप्लायर मार्केट प्लेसमधून खरेदी करुन आपल्या प्रॉफिट मार्जिनसह व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामद्वारे प्रोडक्ट्स विकू शकतात. मीशो पुढील वर्षी जानेवारीपर्यंत इश्यूसाठी अर्ज सादर करण्याची शक्यता आहे.

Ahmednagarlive24 Office