वेबसीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ …एकास अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-वेबसीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ बनवून वेबसाईटवर अपलोड करणारी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने उमेश कामत (४०) याला अटक केली आहे.

पॉर्न फिल्म व्हिडीओ अँप द्वारे परदेशात प्रसारित करण्यात कामत याचा हात आहे. तो एका बड्या उद्योजकाचा पीए असल्याचे समजते. कामत याला न्यायालयाने १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

यापूर्वी या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली होती. पॉर्न व्हिडीओ शूट करून वेबसाईटवर अपलोड करून लाखो रुपयांची कमाई करणारी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिचे पॉर्न फिल्म प्रॉडक्शन हाऊस असल्याचे निष्पन्न झाले आहे.

गहना वेबसीरिज, शॉर्टफिल्मच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ तयार करून वेबसाईटवर ते अपलोड करायची, असा तिच्यावर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी अमेरिकन अँप कंपनीचा प्रतिनिधी असलेल्या उमेश कामत याचे नावही पुढे आल्याने त्याला अटक केली आहे. अभिनयाची आवड असलेले अनेक तरुण-तरुणी मुंबईत येतात.

अभिनय क्षेत्रात संधी मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. याच परिस्थितीचा पुरेपूर फायदा बॉलीवूडशी संबंधित काही मंडळी घेतात.

उ पनगरात बंगले भाड्याने घेऊन त्यांच्या अश्लील व्हिडीओ बनवले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाला मिळाली. मढ बीचवरील ग्रीन पार्क बंगल्यात छापा टाकला. या वेळी एका अश्लील व्हिडीओचे शूटिंग सुरू होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24