Post Office : अनेकजण भविष्यासाठी कुठे ना कुठेतरी गुंतवणूक (Investment) करत असतात. पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजना (scheme) आहेत त्या तुम्हाला कमी गुंतवणुकीत लखपती बनवतील. पोस्ट ऑफिसची अशी एक योजना आहे ज्यामध्ये तुम्ही दररोज १७० रुपये गुंतवून १८ लाखांचा परतावा मिळवू शकता.
या योजना पोस्ट ऑफिसच्या सर्वात फायदेशीर गुंतवणूक योजना आहेत. जर आपण या योजनेतील गुंतवणुकीबद्दल बोललो, तर तुम्हाला या योजनेत फक्त 170 रुपये गुंतवावे लागतील आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला 19 लाख रुपयांचा निधी मिळू शकेल.
तुम्ही अजून ही पॉलिसी घेतली नसेल तर तुम्ही पण करू शकता. या योजनेची सर्व माहिती. ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (Village Sumangal Rural Postal Life Insurance) असे या योजनेचे नाव आहे.
पोस्ट ऑफिसच्या या योजना फक्त ग्रामीण भागात (rural areas) राहणाऱ्या लोकांसाठी आहेत. या योजना आहेत. या योजनेचे नाव ‘ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स’ असे ठेवण्यात आले आहे.
या पॉलिसीमध्ये मनी बॅकचा फायदाही उपलब्ध आहे.
या योजनेत तुम्ही दररोज 170 रुपयांची बचत करून 19 लाख रुपयांचा निधी तयार करू शकता. या प्लॅनमध्ये, पॉलिसीधारकाच्या (Policyholder) जगण्यावर पैसे परत करण्याचा लाभ देखील उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही गुंतवलेली रक्कम, तुम्हाला पूर्ण रक्कम परत मिळते.
ही पॉलिसी घेण्यासाठी वयोमर्यादा किती आहे
या प्लॅनमध्ये पॉलिसीधारकाला मॅच्युरिटीवर बोनसही मिळतो. तुम्ही ही योजना 15 वर्षे आणि 20 वर्षांसाठी घेऊ शकता. या योजनेतील वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, या योजनेतील वयोमर्यादा 19 वर्षे ते 45 वर्षे आहे. या योजनेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स हे आहे की कोणताही ग्रामीण भारतीय या योजनेचा लाभ घेऊ शकतो.