ताज्या बातम्या

Post Office RD : पोस्टाची भन्नाट योजना! 333 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 16 लाखांचा भरघोस परतावा, कसे ते पहा

Published by
Ahmednagarlive24 Office

Post Office RD : तुम्हाला आता पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये कमी रकमेपासून गुंतवणूक करता येते. शिवाय यात भरघोस आणि निश्चित परतावाही मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूकदारांना यात कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही.

त्यामुळे अनेकजण या योजनेत गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट या योजनेचा पोस्ट ऑफिसच्या लघु बचत योजनेत समावेश आहे. या योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.

तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत अवघ्या 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. ही एक छोटी बचत योजना असून तुम्ही तुमच्या बजेटनुसार या योजनेत गुंतवणूक करू शकता. सर्वात अगोदर हे लक्षात घ्या की या योजनेत पाच वर्षांसाठी खाते उघडले जाते.

किती असतो व्याजदर ?

सध्या आवर्ती ठेव योजनेवर 5.8 % व्याज देण्यात येत आहे. हा दर 1 जानेवारी 2023 पासून लागू झाला आहे. सर्व लहान बचत योजनांचे व्याज दर प्रत्येक तिमाहीत सरकारद्वारे निश्चित करण्यात येते. नुकत्याच निश्चित करण्यात आलेल्या दरांमध्ये, आवर्ती ठेव योजनेवर पूर्वीप्रमाणेच व्याज देण्यात येत आहे. त्यात कोणताही बदल नाही.

तरच तुम्हाला मिळतील 16 लाख रुपये

समजा तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी या योजनेत 10 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये गुंतवले तर, तुम्हाला 10 वर्षांनंतर 5.8% दराने 16 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकेल.

हे लक्षात ठेवा की तुमच्या आरडी खात्यात वेळेवर पैसे जमा करा, जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला दंड भरावा लागणार आहे. तर दुसरीकडे, जर तुम्ही सलग 4 वेळा हप्ते जमा केले नाहीत तर तुमचे खाते बंद करण्यात येईल.

लागू असतो कर

गुंतवणुकीपूर्वी हे लक्षात ठेवा की आवर्ती ठेवीतील गुंतवणुकीवर टीडीएस कापण्यात येतो जर ठेव रक्कम 40 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास 10% वार्षिक दराने कर आकारण्यात येतो. आरडीवर मिळणारे व्याज हे करपात्र असून मुदतपूर्तीवर मिळणाऱ्या रकमेवर कर आकारण्यात येत नाही. ज्या गुंतवणूकदारांचे कोणतेही करपात्र उत्पन्न नसते त्यांना FD च्या बाबतीत फॉर्म 15G भरून TDS सूटचा दावा करता येतो.

Ahmednagarlive24 Office