Post Office Scheme: मालामाल होण्याची सुवर्णसंधी ! ‘या’ योजनेत करा फक्त 95 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा ‘इतके’ लाख रुपये

Post Office Scheme:  पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना राबवत असते. अशीच एक योजना म्हणजे ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना. या योजनेत तुम्ही फक्त दररोज 95 रुपये जमा केल्यास या योजनेतून तुम्हाला तब्बल 14 लाख रुपये मिळू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो ही योजना ग्रामीण भागात राहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी राबवली जात आहे. चला तर जाणून घ्या या योजनेची संपूर्ण माहिती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ही पॉलिसी कोण विकत घेऊ शकते

ग्राम सुमंगल योजना पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुमचे वय किमान 19 ते 45 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.  या योजनेत, पॉलिसीधारकाला विमा पूर्ण झाल्यावर बोनस देखील मिळेल. ही योजना 1995 मध्ये सुरू झाली. ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजनेत गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला बोनससह संपूर्ण विम्याची रक्कम मिळते. ही सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना एक एंडोमेंट योजना आहे. ही योजना अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे, ज्यांना वारंवार पैशांची गरज भासते.

या पॉलिसीचे फायदे

ग्राम सुमंगल योजनेची पॉलिसी मुदत 15 आणि 20 वर्षे आहे आणि किमान 19 वर्षे वय असलेली व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकते. यामध्ये गुंतवणूकदाराला ठराविक कालावधीनंतर पैसे परत मिळतात. उदाहरणार्थ, समजा, जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 25 व्या वर्षी गुंतवणूक केली, तर त्याला/तिला या योजनेत 7 लाख रुपयांच्या विमा रकमेसह 20 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. या प्रकरणात, दरमहा 2853 रुपये हप्ता म्हणजेच सुमारे 95 रुपये प्रतिदिन जमा करावे लागतील. यानंतर, गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीवर सुमारे 14 लाख रुपये मिळतील. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, गुंतवणुकीची रक्कम नॉमिनीला जाते.

हे पण वाचा :-  Amazon Sale: बंपर ऑफर! पुन्हा मिळणार नाही संधी ; पूर्ण पैसे न भरता घरी आणा ‘हा’ मस्त स्मार्टफोन