Post Office Scheme : या योजनेत 200 रुपये गुंतवणूक करा, लवकरच मिळतील 6 लाखांपेक्षा जास्त पैसे; जाणून घ्या योजना

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे हे 100% सुरक्षित आहे. यामुळे लोक या योजनेत गुंतवणूक करत असतात. जर तुम्हालाही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पोस्ट ऑफिसच्या या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये तुम्ही खूप कमी रक्कम जमा करून गुंतवणूक करू शकता. याशिवाय रिकरिंग डिपॉझिटमधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित मानली जाते. या योजनेत तुम्ही 100 रुपयांपासून ते हवी तेवढी गुंतवणूक करू शकता, यासाठी कोणतीही मर्यादा नाही.

तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक वर्ष, दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी आवर्ती ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत पोस्ट ऑफिसकडून दर तीन महिन्यांनी व्याजही दिले जाते.

Advertisement

कर्ज घेण्यासाठी काय मार्ग आहे ?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती आपले खाते उघडू शकते. आई किंवा वडील अल्पवयीन मुलाचे खाते उघडू शकतात.

या पोस्ट ऑफिस स्कीममधूनही तुम्ही कर्ज घेऊ शकता. तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्या पोस्ट ऑफिस शाखेशी संपर्क साधा. हे कर्ज तुम्ही 12 हप्त्यांमध्ये जमा करू शकता. तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या 50% कर्ज घेऊ शकता.

Advertisement

तुम्हाला 6 लाखाहून अधिक रुपये मिळतील

रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये तुम्ही दरमहा 6,000 रुपये म्हणजेच 200 रुपये जमा केल्यास 90 महिन्यांनंतर म्हणजेच 7.5 वर्षांनंतर तुम्हाला 6 लाख 76 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल.

समजा तुम्ही दरमहा 6,000 रुपये जमा केले, तर एका वर्षात तुम्ही 72,000 रुपये जमा कराल. त्याचप्रमाणे, तुम्हाला 90 महिने किंवा 7.5 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल.

Advertisement

अशा प्रकारे तुम्ही 5 लाख 40 हजार रुपये गुंतवणूक म्हणून जमा कराल. यानंतर, योजनेच्या मॅच्युरिटीवर, तुम्हाला परतावा म्हणून 1,36,995 रुपये मिळतील. तसेच तुम्हाला 90 महिन्यांनंतर एकूण 6,76,995 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्ही आवर्ती ठेवीमध्ये गुंतवणूक करून लाखो रुपये कमवू शकता.