डाक कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न करावा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- भारतीय डाक विभाग अहमदनगर यांचेद्वारे मागील वर्षांपासून आजतायत उत्कृष्ट काम करण्याऱ्या कर्मचाऱ्याचा विशेष गौरव भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत प्रधान डाकघर अहमदनगर याठिकाणी श्री एस रामकृष्ण प्रवर डाक अधीक्षक अहमदनगर यांचे हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना रामकृष्ण यांनी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करत आगामी काळात याही पेक्षा चांगले काम करत आपल्या अनमोल ग्राहकांना अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.

फेब्रुवारी ते मार्च दरम्यान ध्येय लक्ष्य प्राप्ती या योजनेअंतर्गत पुणे विभागात दिड लाख नवीन खाते उघडण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते,त्यात अहमदनगर विभागास दहा हजार नवीन खाते उघडण्याचे उद्धिष्ट असताना अहमदनगर विभागात 12700 नवीन खाते उघडून भरघोस प्रतिसाद दिला.

नुकताच मिशन रेपीड मध्ये 5 दिवसात अहमदनगर विभागात 2500 चे उद्धिष्ट असताना 4000 नवीन खाते उघडले गेले. यासह पोस्टल लाईफ इन्शुरन्स, ग्रामीण डाक जीवन विमा,पोस्टल बॅंक मध्ये नवीन खाते ,बँकेच्या खातेदारास पोस्टऑफिस मध्ये मोबाईल द्वारेपैसे काढणे (AEPS) या सर्व योजनेत विशेष कामगिरी करणारे सर्वश्री संतोष यादव,

रामेश्वर ढाकणे, श्रीमती पल्लवी मळेकर, प्रकाश कदम, प्रितम वराडे, अजित रायकवाड, अशोक बंडगर, संदीप घोडके, सतिष सोनवणे, सोमनाथ तांबे, इरफान पठाण , पिरमोहमद चौगुले,नवनाथ चोरमले,

विशाल म्हस्के, कल्पना घोडे, अजिनाथ खेडकर, राहुल गरकल, शिवराज राजेभोसले, वाल्मिक जाधव,भिमराज गिरमकर, संजय राऊत, रसूल पठाण, सुदर्शन पठाण,ईश्वर नरोटे,

आकाश बारसकर,मनोज भोसले, विनायक सोनवले यांचेसह महिला प्रधान अभिकर्ते श्रीमती संगीता सुनिल शर्मा, लालावंती गहिनीनाथ पालवे, श्रीमती दिपा महेश राज याचा विशेष गौरव करण्यात आला.

अहमदनगर लाईव्ह 24