अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :-सैनिक बँकेतील चेअरमन शिवाजी व्यवहारे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे व काही संचालक,कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीत आपलाच पॅनल निवडून यावा हा उद्देश ठेवत व बँकेचा पोटनियमाचे उल्लंघन करत एकाच दिवशी तब्बल१४०५ नातेवाईक सभासद केले होते याविरुद्ध सैनिक बँकेचे सभासद बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी,सुदाम कोथिंबीरे,संपत सिरसाठ,बबन दिघे,यांनी सैनिक बँक संस्थापक तथा जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्र्याकडे अपील दाखल केले होते.
म.स.सं अधिनियम १९६० च्या कलम १५४ अन्वये पुनरिक्षण अर्जावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुढे १३ जुलै २०२१ ला सहकार खात्याचे आधिकारी, बँक आधिकारी, व तक्रारदार बाळासाहेब नरसाळे व तक्रारदार यांच्या वतीने विधितज्ञ आयेशा केशोडवाला यांची एकत्रित सुनावणी झाली होती.
सैनिक बॅंक कर्मचारी,चेअरमन व काही संचालकांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन व बँकेच्या पोटनियमाचे व कायद्यातील तरतूदीचे उल्लंघन करत नियमबाह्य सभासद केल्याचा युक्तिवाद विधीतज्ञ आयेशा केशोडवाला,व बाळासाहेब नरसाळे यांनी केला.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सदर मुद्यावर व कायदा व बँक पोटनियमाचे अवलोकन केले असता असा निष्कर्ष काढला की बँकेने केलेली सभासद वाढ ही कायद्यातील तरतूद व बँकेच्या उपविधीचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे केली आहे.त्यामुळे बेकायदेशीर झालेल्या सभासदांना पूर्ण चौकशी होईपर्यंत स्थगिती दिली असून पुढील सुनावणी २१.९.२०२१ रोजी ठेवण्यात आली आहे.
सैनिक बँकेत सत्ताधाऱ्यांनीं लोकशाहीचा अवमान करत बेकायदा,नियमबाह्य सभासद प्रक्रिया राबवून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले होते. “हम करे सो कायदा” अशा प्रकारची निती संचालक मंडळाने अवलंबली होती मात्र सहकार मंत्र्यांनी स्थगिती देऊन सत्ताधाऱ्याच्या या नीतीला पायबंद घातला आहे.