अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- नगर जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश निघाले होते. याला काही काही ओलांडत नाही तोच त्या तीन पोलीस निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यांना स्थगिती मिळाली आहे.
यामुळे ते आता त्यांच्या मूळ पदावर काम करणार आहेत. तर अन्य दोन अधिकाऱ्यांच्या नगर जिल्हा बाहेर बदल्या झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर,
शहर विभागाचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार व पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांचा समावेश असून त्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
पोलीस निरीक्षकांच्या वरिष्ठ पातळीवरून बदल्या नुकत्याच झालेल्या होत्या. त्या बदलांना स्थगिती मिळण्यासाठी तिघांनी प्रयत्न केले होते.
नाशिक परिक्षेत्र विभागातून पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांची नगर येथे बदली करण्यात आली आहे. तर नगर जिल्हा बाहेर पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे व विकास देवरे यांची बदली झाली आहे.