पाणीप्रश्नी ‘या’ नगरपालिकेसमोर मडके फोड आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  गोदावरी तिरावर वसलेल्या कोपरगाव शहराला बारा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे ही लाजिरवाणी बाब असून या नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आह्मी भाजप शिवसेना व मित्र पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो असे वक्तव्य भारतीय जनता पार्टी चे पराग संधान यांनी नगरपालिके समोर आयोजित मटका फोडो आंदोलन प्रसंगी व्यक्त केले.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई यांनी सांगितले की, तोंडावर सुणासुधीचे दिवस आले असून या काळात नगरपरिषद ऐन पावसाळ्यात बारा दिवसाआड पाणी देत शहर वासियाची थट्टा करत असून या कृत्याचा आह्मी निषेध करत आहे.

या वेळी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी सांगितले की, आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरवासियांना नियमित पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे परंतु कोपरगाव चे नगराध्यक्ष व आमदार आशुतोष काळे हे यात सपशेल फेल ठरले आहे.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडेचे पाणी शहरात आणल्यानंतर लोकप्रतिनिधी व नगराध्यक्षांनी त्यात खोडा घातला. त्यामुळे योजनेचे काम रखडले आहे. शहराला पाणी पुरवठा करण्याबाबत सत्ताधार्‍यांनी भाजप व शिवसेना नगरसेवकांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात असल्याचा घणाघाती आरोप या वेळी निखाडे यांनी केला.

केवळ प्रसिद्धीचा खटाटोप करत शहरवासियांना भुलभुलैय्या दाखवत असल्याचा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यावर निशाणा साधत ऐन पावसाळ्यात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करुन शहरवासियांवर हा अन्याय होत असल्याची भावना आंदोलन कर्त्यांनी मांडली.

यावेळी आंदोलन कर्त्यांनी कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना शहर वासीयांना नियमित व स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा असे निवेदन दिले. या प्रसंगी शिवसेनेचे कैलास जाधव, जितेंद्र रानशूर आदींनी नगरपालिकेच्या या कारभाराचा निषेध व्यक्त केला,

या वेळी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, पराग संधान, माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई, शहराध्यक्ष दत्ता काले, शिवसेना गटनेते योगेश बागुल, शिवसेनेचे कैलास जाधव, अतुल काले तसेच भाजपा शिवसेना पक्ष्याचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24