अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- महापारेषाण व महावितरणचे अभियंते व कर्मचारी आज मंगळवार दि.10 ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणीक संपावर जात आहे.
यासंपामुळे तालुक्यातील नेवासा, भेंडा या दोन प्रमुख उपकेंद्रासह मुळा व ज्ञानेश्वर, अशोकनगर सहकारी कारखाना यांचा विद्युत पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शकता निर्माण झाली आहे.
ऊर्जा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी आणि इंजिनिअर्सने संसदेच्या चालू मान्सून सत्रात वीज (सुधारणा) विधेयक, 2021 मांडण्याच्या विरोधात 10 ऑगस्ट रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
देशभरातील15 लाख कर्मचारी संपावर जाणार आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी नगर जिल्ह्यातील सर्व वीज अधिकारी व कर्मचारी ही संपावर जात आहे.
वीज कामगार, अभियंते व अधिकारी संघर्ष समितीच्या आदेशानुसार, केंद्र सरकारच्या वीज उद्योग मनमानी खासगीकरण विरोधात लाक्षणिक संप पुकारला आहे.
या संपात नेवासा तालुक्यातील 220 के.व्ही नेवासा व भेंडा ,घोडेगाव वीज उपकेंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच आऊटसोर्सिंग स्टाफ सुद्धा 100% संपामध्ये कर्मचारी सहभागी होत आहे.
त्यामुळे नेवासा तालुक्यासह शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील वीजपुरवठा आज खंडित, विस्कळित होण्याची शक्यता आहे. वीज खासगीकरणाच्या
विरोधात केंद्र सरकारच्या मनमानी कारभारास कंटाळून संयुक्त वीज कृती समितीने हे आंदोलन पुकारले असून संपूर्ण महाराष्ट्भरातील अभियंता कर्मचारी वर्ग या संपात सहभागी होत आहे. या संपामुळे विद्युत पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.