ताज्या बातम्या

वीज पुरवठा खंडित…संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- बंद केलेले रोहित्र सुरु करण्यासाठी देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी महावितरणने बंद असलेले रोहीत्र त्वरीत सुरु करण्यात येतील.

मात्र, शेतकऱ्यांनी सात दिवसांत शेतीबिलाची चालू थकबाकी भरावी, असे आश्वासन मिळाल्यानंतरच ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. महावितरणने परिसरातील रोहित्र कुठलीही पूर्वसूचना न देता बंद केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी शेकडो शेतकऱ्यांनी १ वाजता सत्यजित कदम यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी सहाय्यक अभियंता ठुबे हे कार्यालयात उपस्थित होते. यावेळी आंदोलक कदम म्हणाले, रब्बी हंगामाच्या तोंडावर रोहित्र का बंद केले? शेतकऱ्यांना नोटीस दिल्या का? अशी प्रश्नांची सरबत्ती करुन धारेवर धरले. रोहित्र त्वरीत सुरु करा, अन्यथा ठिय्या आंदोलन सुरु करण्यात येईल, असे सांगितले.

परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजबिल भरल्याशिवाय रोहित्र सुरु होणार नसल्याचे सांगितल्याने संतप्त झालेल्या कदमांनी शेतकऱ्यां समवेत ठिय्या आंदोलन सुरु केले.

सुमारे तासभर सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनानंतर कोणताच तोडगा निघत नसल्याने कदम व उपस्थित शेतकरी संतप्त झाले व त्यांनी कार्यालयात अधिकाऱ्यांना कोंडून घेतले. याची माहिती वरिष्ठांना समजल्यानंतर या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी व त्यांचे सहकारी दाखल झाले.

कदम यांनी त्यांना मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, असे सांगितले. शेवटी चर्चेअंती सात दिवसांत बील भरण्याचे ठरल्याने व तोपर्यंत रोहित्र बंद न करण्याचे ठरल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office