PPF Account : निम्मा सप्टेंबर महिना संपला आहे. या महिन्यात अनेक आर्थिक कामांची आणि बदलांची अंतिम मुदत संपत आहे. त्यामुळे जर तुम्ही या महिन्यात काही महत्त्वाची कामे पुनः केली नसतील तर ती आजच पूर्ण करून घ्या नाहीतर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. कसे ते जाणून घ्या सविस्तरपणे.
आधारकार्ड आवश्यक
जर तुम्ही PPF, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र यांसारख्या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन आधारकार्ड जमा करावे लागणार आहे.
जर तुम्ही तसे केले नाही तर तुमची गुंतवणूक गोठवली जाईल. हे लक्षात घ्या वित्त मंत्रालयाने PPF, NSC आणि इतर बचत योजनांसाठी आधार आणि पॅन बंधनकारक केले आहे. जर कोणी खाते चालवत असेल आणि त्याने खाते कार्यालयात आधार क्रमांक सादर केला नसल्यास त्याला लवकर हे काम करावे लागणार आहे.
SBI WeCare
SBI ने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली WeCare स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट योजनेची अंतिम मुदत 30 सप्टेंबर रोजी संपत असून या योजनेत फक्त ज्येष्ठ नागरिकच सहभागी होऊ शकतात. यात त्यांना FD वर 7.5 टक्के व्याज देण्यात येत आहे जे सामान्य लोकांपेक्षा 100 बेसिस पॉइंट्स जास्त असून हा लाभ नवीन ठेवींवर आणि मुदतपूर्ती ठेवींच्या नूतनीकरणावर देण्यात येत आहे.
IDBI अमृत महोत्सव एफडी
हे लक्षात घ्या आयडीबीआय बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदतही ३० सप्टेंबर रोजी संपत असून या योजनेअंतर्गत, बँक 375 दिवसांच्या कालावधीवर 7.10 टक्के व्याज देण्यात येत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के व्याज देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 444 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वसामान्यांना 7.15 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.65 टक्के व्याज देण्यात येत आहे.
डिमॅट आणि एमएफ नामांकन
मार्केट रेग्युलेटर सेबीने डिमॅट खातेधारकांसाठी नामांकन करण्यासाठी किंवा नामांकन रद्द करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर निश्चित करण्यात आली असून जर त्यांनी तसे केले नाही तर त्याचा म्युच्युअल फंड फोलिओ डेबिटसाठी गोठवण्यात येईल. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी नामनिर्देशित तपशील सबमिट करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. SEBI ने या संदर्भात 28 मार्च 2023 रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आले होते.
2000 रुपयांची नोट
2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा आरबीआयने केली होती. ग्राहकांना ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची किंवा त्या बदलून घेण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे जर तुमच्याजवळ 2000 रुपयांची नोट असेल तर तुम्ही ती बँकेत जमा करू शकता किंवा 30 सप्टेंबरपर्यंत बदलू शकता.