Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

PPF : सरकार बनवणार तुम्हाला करोडपती! 417 रुपयांच्या बदल्यात मिळवा 1 कोटी रुपये, कसे ते जाणून घ्या?

केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसाठी बचतीच्या हेतूने अनेक लहान बचत योजना राबवण्यात येतात. यापैकी एक म्हणजे PPF.

PPF : सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थातच पीपीएफ होय. सर्वात महत्त्वाची म्हणजे केंद्र सरकारची ही योजना जोखीममुक्त योजना आहे. ही योजना गुंतवणूकदारांना खात्रीशीर परतावा देते. त्यामुळे अनेकजण यात गुंतवणूक करतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जर तुम्हाला कमीत कमी जोखीम घेऊन कोट्यवधी रुपयांचा निधी उभारायचा असेल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. इतकेच नाही तर या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर तुम्ही यात गुंतवणूक केली तर तुम्हाला कर लाभ मिळतो.

भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणुकीचे खूप फायदे आहेत. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला इतर बचत योजनांपेक्षा चांगले व्याज दर मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन हे खाते उघडू शकता.

व्याजात झाला बदल

हे लक्षात ठेवा की PPF वर उपलब्ध असणारे व्याज दर केंद्र सरकारद्वारे प्रत्येक तिमाहीत नियंत्रित करण्यात येते. सरकारकडून या तिमाहीसाठी म्हणजेच 1 एप्रिल 2023 साठी PPF च्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही. ग्राहकांना या तिमाहीतही छोट्या बचत योजनेवर 7.1 टक्के व्याजदर मिळेल.

या लोकांना करता येत नाही पीपीएफमध्ये गुंतवणूक

तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंतच गुंतवणूक करता येते. सरकार तुम्हाला यात गुंतवणूक करण्यासाठी दोन पर्याय देत असून तुम्हाला हवे असेल तर तुम्ही प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करू शकता नाहीतर तुम्हाला सर्व पैसे एकरकमी जमा करता येते. तसेच सरकारच्या नियमांनुसार या योजनेत फक्त भारतीय नागरिकांना गुंतवणूक करता येते, सरकार कोणत्याही अनिवासी भारतीयाला यात गुंतवणूक करण्याची परवानगी देत ​​नाही.

लक्षाधीश होण्याचे सूत्र

जर तुम्ही 25 वर्षे प्रत्येक महिन्याला 12500 रुपये गुंतवले तर तुम्ही करोडपती होऊ शकता. अशी गुंतवणूक करून, तुम्ही एका वर्षात एकूण 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. यात 25 वर्षांत तुम्ही 37,50,000 रुपये गुंतवले तर ज्यावर 65,58,015 रुपयांचे व्याज 7.1 टक्के दराने मिळेल. 25 वर्षांनंतर तुमच्याकडे 1.03 कोटी रुपयांचा निधी असणार आहे.