PPF : सावधान! पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ गोष्टी, नाहीतर होईल खूप मोठे नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PPF : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ हा गुंतवणुकीचा चांगला आणि लोकप्रिय पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक दारांना दीर्घ काळासाठी करता येते. या योजनेत मोठ्या रकमेची गुंतवणूक करता येत असल्याने त्यामुळे त्यातून चांगले लाभ मिळतात.

त्यामुळे अनेकजण या योजनेत गुंतवणूक करत असतात. परंतु या योजनेचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. जर तुम्हीही पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक करणार असाल तर त्याबाबत अगोदरच माहिती घ्या. नाहीतर तुम्हाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागेल.

सध्या PPF चा व्याजदर 7.1 टक्के इतका असून जो चालू आर्थिक वर्षात EPF च्या 8.15 टक्के व्याजदरापेक्षा खूप कमी आहे. अनेक नोकरदार वर्ग कर वाचवण्यासाठी PPF चा पर्याय निवडत असतात, त्या बदल्यात त्यांना व्हॉलेंटरी प्रॉव्हिडंट फंडमध्ये पैसे गुंतवता येतात, ज्याच्या आधारावर त्यांना जास्तीत जास्त बचतीसह चांगले व्याज मिळेल. समजा तुम्ही नोकरी करत असल्यास तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो, ही एक सर्वोत्तम कर बचत योजना असून जी तुम्हाला हमखास परतावा देते.

परंतु हे लक्षात घ्या की तुम्हाला या योजनेत केवळ 15 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते, ही योजना दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी आहे. समजा तुम्हाला अचानक पैशाची गरज पडली तर तुम्हाला इतर पर्यायांकडे लक्ष द्यावे लागू शकते.

मर्यादा असते निश्चित

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला PPF खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. मागील काही वर्षांपासून सरकारकडून त्याच्या मर्यादेत कोणताच बदल करण्यात आला नाही. त्यामुळे नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी अडचण ठरत आहे. ज्या कर्मचाऱ्यांना यात जास्तीत जास्त गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी VPF मध्ये गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय आहे, जेथे इतर कोणत्याही कराच्या पगारातून 2.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.

पैसे काढयचे असतील तर आहेत हे नियम

पीपीएफमध्ये मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी अनेक अटी आहेत उदाहरणार्थ तुम्हाला आर्थिक वर्षात केवळ एकदाच पैसे काढता येतात आणि तेही खाते उघडण्याचे वर्ष वगळता 5 वर्षांनी. हे लक्षात ठेवा की तुम्ही आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पीपीएफ खाते उघडले तर, तुम्हाला आर्थिक वर्ष 2029 च्या 30 तारखेपूर्वी पैसे काढता येत नाही. तसेच खाते मुदतीपूर्वी बंद करताही येत नाही. तुम्ही हे खाते 5 वर्षानी बंद करू शकता ज्यावर 1 टक्के व्याज कपात करण्यात येत आहे.