PPF Scheme : कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! PPF व्याजदरात मोठी वाढ, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PPF Scheme : सर्वसामान्य लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे अनेक योजना राबवण्यात येतात. त्यापैकी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना खूप प्रसिद्ध आहे. अनेकजण या योजनेत गुंतवणूक करतात.

या योजनेचा सर्वात मोठा फायदा हा आहे की या योजनेत गुंतवणूकदारांना निश्चित परतावा मिळतो. शिवाय कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. त्यामुळे अनेकजण सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना करदात्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

तुम्हाला या योजनेत आयकर कलम 80सी अंतर्गत 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळत आहे. हे लक्षात घ्या की या योजनेअंतर्गत जमा ]रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर लागू होत नाही, तसेच तुम्हाला पीपीएफच्या मॅच्युरिटी रकमेवर कोणताही कर भरावा लागत नाही.

या योजनेचा लॉक इन कालावधी 15 वर्षांचा आहे. समजा तुम्हाला EPF आणि राष्ट्रीय पेन्शन, या योजनांमध्ये गुंतवणूक करायची नसल्यास तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्हाला गुंतवलेल्या रकमेवर चांगला परतावा मिळेल. त्यामुळे आजच या योजनेत गुंतवणूक करा.

कोट्यवधी गुंतवणूकदारांनी गुंतवले पैसे

करोडो भारतीय लोकांनी पीपीएफमध्ये गुंतवणूक केली आहे. पीपीएफचे महत्त्व लक्षात घेता, गुंतवणूकदारांना विश्वासार्हता आणि सुरक्षितता प्रदान करण्यासाठी सरकार अनेकदा त्याचे दर स्थिर ठेवत असते परंतु, यात बराच काळ बदल झालेला नाही. सध्या, PPF गुंतवणूकदारांना PPF वर 7.1% दराने व्याज देण्यात येत आहे.

आवर्ती ठेवींवरील वाढले व्याज

नुकतेच केंद्र सरकारकडून आवर्ती ठेवींवरील व्याजदर वाढवण्यात आले ​​आहेत जसे की आरडी आणि पोस्ट ऑफिस एफडी. 30 जून रोजी, सरकारने 1-वर्ष आणि 2-वर्षीय पोस्ट ऑफिस एफडीच्या दरात 6.9% वरून 7.0% पर्यंत .10% ने वाढ केली होती. त्याशिवाय पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या आवर्ती ठेव (RD) साठी व्याज दर .30% ने वाढ केली आहे. यानंतर आरडीवरील व्याजदर 6.5% पर्यंत वाढला आहे.