PPF Scheme : सध्या बचत करण्यासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक करत असाल तर बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.
ही सरकारची दीर्घकालीन बचत योजना आहे. जर तुम्ही या योजनेत तुम्ही योग्य वेळी गुंतवणूक केली तर तुम्हाला 1 कोटी रुपयांपर्यंत निधी जमा करता येईल. परंतु जर तुम्ही पीपीएफ योजनेतही गुंतवणूक करत असाल तर ही तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल.
या तारखेपूर्वी जमा करा पैसे
समजा तुम्ही पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणार असल्यास तुम्हाला महिन्याच्या 5 तारखेची माहिती असावी. कारण तुम्ही या तारखेला पैसे जमा केले तर तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळेल. याबाबत सरकारने माहिती दिली आहे. तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला हे माहिती असावे की तुम्हाला महिन्याच्या 5 तारखेला पैसे जमा करावे लागतील. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला त्या महिन्याचे व्याज मिळणार नाही.
किती करता येईल गुंतवणूक?
पीपीएफ योजनेत तुम्हाला एका वर्षात 1.5 लाख रुपये जमा करता येतील. समजा तुम्ही ही रक्कम 20 एप्रिल रोजी पीपीएफ खात्यात जमा केली तर तुम्हाला प्रत्येक वर्षी केवळ 11 महिन्यांसाठी व्याज मिळेल. परंतु तुम्ही ही रक्कम 5 एप्रिल रोजी जमा केले तर तुम्हाला 10,650 रुपये नफा मिळेल.
किती मिळेल व्याज?
पीपीएफ योजनेतील व्याजाबद्दल बोलायचे झाले तर गुंतवणूकदारांना 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. महिन्याच्या 5 तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत किमान शिल्लक राहते. त्यावर त्याच महिन्याचे व्याज जोडण्यात येते. या महिन्याच्या 5 तारखेनंतर जे काही पैसे जमा होतील.
तसेच हे लक्षात घ्या पीपीएफमध्ये व्यक्ती फक्त एकदाच खाते चालू करू शकते. 12 डिसेंबर 2019 नंतर चालू केलेले एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते बंद केले जातील. त्यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. अनेक पीपीएफ खाती एकत्र करण्यावर देखील बंदी आहे.