प्राजक्त तनपुरे यांच्याकडून जनतेला झुलवत ठेवण्याचे काम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- विधानसभा निवडणुकीच्या काळात मुळा धरणाचे पाणी बीडला जाणार ही अफवा उठवून राहुरी मतदारसंघातील जनतेत संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी मते मिळवण्यासाठी हा खटाटोप केला.

आश्वासने देऊन त्यांच्याकडून जनतेला झुलवण्याचे काम सुरू आहे. आज राज्यात महाआघाडी सरकार असून तुम्ही व तुमचे मामा मंत्री आहेत.

बीडला पाणी जाणार होते, तर लेखी पुरावा दाखवा, अन्यथा जनतेची माफी मागा, अशा शब्दात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना सुनावले.

ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या निषेधार्थ शनिवार २६ जूनला राहुरीत होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाच्या नियोजनासाठी राहुरीतील मुळा प्रवरा कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

कर्डिले म्हणाले, शेतकरी, कामगार व राहुरी तालुक्यातील बाजारपेठेचे भवितव्य अवलंबून असलेल्या डाॅ. तनपुरे साखर कारखान्याला जिल्हा बँकेच्या माध्यमातून वेळोवेळी मदतीचे काम केले.

मात्र, साखर कारखान्याचे प्रश्न घेऊन कर्डिले यांच्याकडे जाणे तनपुरे यांना आवडत नाही. डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखाना १०० कोटी रुपये कर्जात घालण्याचे काम तनपुरे यांनी केले. प्रथम जिल्हा बँकेच्या कर्जाचे पैसे भरण्याची व्यवस्था करावी,

असा सल्लाही कर्डिले यांनी दिला. यावेळी डाॅ. तनपुरे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शामराव निमसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, राहुरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, मुळा-प्रवरा संचालक रावसाहेब तनपुरे, साखर कारखाना संचालक रवींद्र म्हसे,

उत्तम आढाव, कैलास पवार, अर्जुन बाचकर, नगरसेवक शहाजी जाधव, माजी उपनगराध्यक्ष आर. आर. तनपुरे, मधुकर पवार, अमोल भनगडे, नारायण झावरे, नानासाहेब गागरे, राजेंद्र उंडे, गणेश खैरे, सुजय काळे, सचिन मेहेत्रे, नारायण धोंगडे आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24