प्रांताधिकारी व तहसीलदारांनी केले हॉटेल सील..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-कोरोना पार्श्वभूमीवर लॉगडाऊन सुरू असल्याने जिल्हाधिकारी यांनी हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश दिले असताना राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावरील आबासाहेब वाळुंज यांच्या मालकीचे मनीषा हॉटेल आज दुपारी सुरू असल्याचे निदर्शनास येताच प्रांताधिकारी डॉ.दयानंद जगताप व तहसीलदार एफ.आर.शेख यांनी सदर हॉटेल ७ दिवसासाठी सील केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे लॉगडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा(ठराविक वेळेत) वगळता अन्य सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असताना राहूरी फॅक्टरी येथील हॉटेल मनीषा खुलेआम सुरू होते.

आज दुपारी प्रांताधिकारी दयानंद जगताप व राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख शासकीय वाहनातून राहुरीकडे जात असताना सदर हॉटेल सुरू असल्याचे दिसून आले.

त्यांनी सदर हॉटेल ७ दिवस सील करण्याचे नगरपालिका मुख्याधिकारी अजित निकत यांना कळविले त्यानुसार नगरपालिका कार्यालयीन अधिक्षक बन्सी वाळके,

सुदर्शन जवक, भरत साळुंके, सोमनाथ उर्फ पिंटू सूर्यवंशी आदी पथकाने हॉटेल सील करण्याची प्रकिया पूर्ण करण्याची प्रकिया केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24