अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- विनाकारण घरातून बाहेर पडत असाल तर मग पोलिसांच्या त्या अनोख्या कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे. याकामी राजूर पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली असून, आता मोकार फिरणाऱ्यांवर कोरोनाची चाचणी केली जाणार आहे.
राज्यात वाढत्या कोरोना संक्रमांचा फटका शहरी भागासह ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसत आहे.शहरी भागातून आता ग्रामीण भागातही कोरोनाने थैमान घातले आहे.राजूर सारख्या अतिदुर्गम भागात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता आरोग्य विभाग,पोलीस प्रशासन कंबर खोसून सज्ज झाले आहे.आता विनाकारण घराबाहेर मोकाट फिराल तर राजूर पोलिसांकडून रॅपिड अँटीजन टेस्टचा प्रसाद मिळणार.या टेस्ट मध्ये मोकाट,
विनाकारण फिरणाऱ्यांमधून ज्या कोणी इसमाची टेस्ट पॉझिटिव्ह येणार त्यास आता थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी,मग काय हाच त्रास मोकाट फिरणाऱ्या इसमाच्या घरच्यांना देखील पूर्ण कुटुंबाची केली जाणार रॅपिड अँटीजन टेस्ट.
मग मोकाट फिरणाऱ्यांनो सावधान घरात बसा नाहीतर होईल रॅपिड अँटीजनची टेस्ट मग इथे कुणालाही सोडले जाणार नाही राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी केले जनतेला आव्हान केले आहे.