अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-नगर – राजकीय पदाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन ते सोडविले पाहिजे. राजकारणाबरोबरच समाजकारण केल्यास यश हे मिळत असते.
समाजाने ज्या विश्वासाने आपल्यावर जबाबदारी दिली आहे ती समर्थपणे सांभाळून वंचित घटकांसाठी काम केले पाहिजे हेच काम प्रशांत गायकवाड व किरण काळे करत आहेत.
प्रशांत गायकवाड यांनी आपल्या कार्याने अनेक क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. तर किरण काळे नगर शहरातील प्रश्नांसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असाच आहे.
या तरुण नेतृत्वामुळे समाजामध्ये बदल घडून चांगली कामे त्यांच्या हातून घडेल, असा विश्वास जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष हभप विश्वनाथ राऊत यांनी केले.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या नूतन संचालकपदी प्रशांत गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल तसेच काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष हभप विश्वनाथ राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अॅड.रमेश नागवडे, अनंता गारदे, सय्यद खलील, श्री.झावरे, विकास राऊत, सुभाष राऊत आदि उपस्थित होते.
याप्रसंगी प्रशांत गायकवाड व किरण काळे यांनी सत्काराबद्दल आभार मानून आपण राजकारणापेक्षा समाजकरणाल महत्व दिले आहे.
समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी आपण नेहमीच पुढाकार घेतला आहे. लोकांची कामे झाली पाहिजे ही प्रामाणिक भावना असून, आपल्या सारख्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करत राहू, असे सांगितले.