अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- आज दि. 15 जून रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री व शिर्डी विधानसभा मतदार संघाचे सन 1994 पासून आजपावेतो सलग प्रतिनिधित्व करणारे विकासाचे अग्रदूत सन्मा. आमदार श्री. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचा जन्मदिवस.
महाराष्ट्रात आजपर्यंत आपण अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली घराणी पाहिली आहेत परंतु विकासाच्या व नवनिर्मितीच्या विकास फलकावर ठळकपणे आपल्या कार्याचा ठसा निर्माण करणारे एकमेव घराणे म्हणजेच विखे पाटील घराणे.
वडील, घर, वारसा या परंपरेनुसार “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे आपुले” गोर-गरिबां विषयीची जाण व संकटकाळात धावून जाण्याची परंपरा साहेबांनी आजपर्यंत खंडित होऊ दिली नाही. वडील,आजोबा यांच्या दिशादर्शक विचारातून पुढे येणारे कुशल नेतृत्व म्हणजेच नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब. शासन कोणाचेही असो पण जनतेच्या मनातील खरे नामदार म्हणजे साहेबच.
आज अहमदनगर जिल्ह्याचा शैक्षणिक, औद्योगिक, कृषी विषयक चेहरामोहरा बदलण्याचे कारण म्हणजे स्वतः साहेबच. आपल्या कामकाजाची सुरुवात पहाटे साडे पाच वाजेपासून केल्यानंतर साहेबांना दिवस कसा निघून जातो हे कधीच समजत नाही.
आजही संपूर्ण जगासमोर कोरोना रुपी शत्रूचा संहार सुरूच आहे. भारतालाही खूप मोठ्या प्रमाणात हानी याची पोहोचली आहे. त्यात महाराष्ट्रात खऱ्या विकास कार्याचा कस लागलेला आपणास ठळक दिसतो. नामदार साहेबांना पहिल्यापासूनच कोणत्याही कार्याची नुसतीच प्रसिद्धी न करता कार्याची फलश्रुती अपेक्षित असते आणि तेही पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत.
आपले आजोबा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकरी सावकारशाहीतून मुक्त करण्यासाठी केलेले योगदान, वडील पद्मभूषण खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारातून निर्माण झालेला “सुजलाम सुफलाम” परिसर व शैक्षणिक, औद्योगिक विषयक क्रांती अविरत सुरू ठेवतानाच साहेबांनी विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडवत एक विकासाचे मॉडेल हे जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले आहे
कोरोना या महामारीचे उच्चाटन करण्यासाठी साहेबांनी सर्वात प्रथम प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी येथे मोफत प्रवरा कोविड सेंटर तसेच सिंधू अन्नछत्रालय, शिर्डी येथे कोविड सेंटर असे विविध उपक्रम राबवून फक्त मतदारसंघा पुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण जिल्हाभर कोविड रुग्णांना सेवा देण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
जिल्ह्यात जिल्ह्याबाहेर सामान्य रुग्णांना कुठेही बेड, ऑक्सीजन, सोबतच व्हेंटिलेटर याची कमतरता पडू नये याकरिता सर्व बाबींवर साहेबांचे कार्य सामान्य माणसाच्या काळजात घर करून गेले. सद्यपरिस्थितीची खरी गरज ओळखून डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, नगर मध्ये ऑक्सीजन प्लांट निर्माण करून, संपूर्ण भारतातील पहिला प्रकल्प म्हणून सुरू केला.
यातून रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल. कोरोना रुग्णांना योग्य आहार, व्यायाम व इलाज यासंदर्भात दैनंदिन व तपशीलवार माहिती साहेब व त्यांच्या सोबतच त्यांचे पुत्र नगर दक्षिण चे खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील तसेच जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील हे नेहमी घेत आहेत.
झूम ॲपद्वारे शासनाला वेळोवेळी मार्गदर्शनासह आवश्यक त्या सूचना सुचविणे, शिर्डी संस्थान या कोविड सेंटरमध्ये सणावाराच्या दिवशी आमरसाचे भोजन देणे, प्रवरा कोविड सेंटर मधील सोई-सुविधा व दररोज स्वतः साहेब तेथे थांबून प्रत्येक रुग्णांची आस्थेवाईकपणे मदतीसह वैद्यकीय वापराचा ऑक्सिजन,
ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्टर, व्हेंटिलेटर, मास्क, हेल्मेट या उपकरणांची माहिती व सुविधा रुग्णांना मिळते की नाही हे स्वतः रुग्णांच्या नातेवाइकांशी संवाद साधून करीत असत. कोरोना या महामारीच्या काळात तर रुग्णांसह समाजामधील कोविडची भीती व ज्या घरात रुग्ण आहे त्या घराबद्दल समाजाचा असणारा दृष्टिकोन बदलण्यासाठी साहेबांनी केलेल्या वेगळ्या दृष्टिकोनाचा प्रयत्न रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनाही सुखद धक्का देऊन गेला
त्यामुळे सर्वात प्रथम साहेबांनी आपला शिर्डी विधानसभा मतदारसंघ कोविड मुक्त करून सर्वांसमोर आदर्श ठेवला. अर्थात यात खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील व मा. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांची भरीव कामगिरी विसरून चालणार नाही.
यामुळेच आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबांबद्दल सामान्य जनतेच्या मनात भावना एकच आहे. “आम्ही देवही बघितला आणि देवयोगीही” साहेब आपणास उदंड आयुष्यासह उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.